रत्नागिरी जिल्हाविषयी

         देवभूमी रत्नागिरी पुरण कथांचा आधार घ्यायचा झाला तर सारी पृथ्वी दान केल्यानंतर स्वतःला राहण्यासाठी जागा उरली नाही म्हणून परशुरामाने बाण मारून सागर १०० योजने मागे हटवला आणि कोकणची हि देवभूमी निर्माण केली. त्याच कोकणातील एक जिल्हा म्हणजे रत्नागिरी...! रत्नागिरी म्हटल्यावर आठवतात ते निर्मळ, स्वच्छ, सुंदर समुद्र किनारे व हापूस आंबे, काजू, नारळी, पोफळीच्या बागा ! म्हणूनच पर्यटन दृष्ट्या हा अतिशय महत्वाचा जिल्हा आहे. जिल्ह्यातला जगप्रसिद्ध हापूस आंबा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले स्थान अधिकाधिक बळकट करतो आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांपासून सर्वांनाच हा आंबा तोंडात बोट घालावयास भाग पाडतो आहे. ह्या आंब्याचे माहेरघर म्हणजे रत्नागिरी.

अधिक माहिती

जिल्हा परिषद मान्यवर

सन्मा. श्री. कीर्ती किरण पुजार
मुख्य कार्यकारी अधिकारी