• A
  • A+
  • A-

 जिल्हा परिषद रत्नागिरी

  • मुखपृष्ठ
  • जिल्ह्याविषयी
    • सर्वसाधारण माहिती
    • जिल्ह्याचा इतिहास
    • जिल्ह्याचे लोक प्रतिनिधी
    • कला, क्रीडा व सण-उत्सव
    • पर्यटनस्थळे
    • नकाशा
  • जिल्हा परिषद
    • जिल्हा परिषदेविषयी
    • जि. प. अधिनियम
    • रचना व प्रशासन
    • पंचायत समिती
  • मान्यवर व अधिकारी
    • मान्यवर
    • जिल्हा परिषदेचे पदाधिकारी
    • जिल्हा परिषद सदस्य
    • जिल्हा परिषदेचे अधिकारी
    • पंचायत समिती सभापती
    • पंचायत समितीचे अधिकारी
    • ग्रामसेवक
  • जि. प. विभाग
    • सामान्य प्रशासन
    • ग्रामपंचायत विभाग
    • जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
    • अर्थ विभाग
    • शिक्षण विभाग
      • प्राथमिक शिक्षण
      • माध्यमिक शिक्षण
    • समाज कल्याण विभाग
    • महिला व बालकल्याण विभाग
    • पशुसंवर्धन विभाग
    • कृषी विभाग
    • ग्रामीण पाणी पुरवठा विभाग
    • बांधकाम विभाग
      • बांधकाम विभाग - रत्नागिरी(रत्नागिरी/संगमेश्वर/लांजा/राजापूर)
      • बांधकाम विभाग - चिपळूण(चिपळूण/गुहागर/खेड/दापोली/मंडणगड)
    • आरोग्य विभाग
    • जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन
    • यांत्रिकी विभाग
    • म. ग्रा. रो. ह. यो.
  • प्रसार प्रसिध्दी
    • घोषणा व जाहिरात
    • बातम्या
    • उपक्रम व छायाचित्र दालन
    • व्हिडीओ गॅलरी
  • ई-निविदा
  • इतर
    • समस्या/सूचना
    • विविध सभांचे वेळापत्रक
    • प्रशिक्षण
    • जि.प.रत्नागिरी परीक्षा/उत्तरपत्रिका
    • सार्वजनिक सुट्ट्या
    • ई-ऑफिस
      • ई-टपाल
      • दिव्यांग सांगाती
    • मराठी टायपिंग टूल्स
    • जि.प. विभाग लॉग इन
    • संकेतस्थळ अद्यावत अर्ज नमुना
  • जि.प.आदेश
  • संपर्क
  • मुखपृष्ठ
  • जिल्ह्याविषयी
  • कला, क्रीडा व सण-उत्सव

कला, क्रीडा व सण-उत्सव

  • सण-उत्सव
  • कला
  • क्रीडा
  • गणेशोत्सव
    गणेशोत्सव

    रत्नागिरीत साजरे केले जाणारे अनेक सण-उत्सव हे स्थानिकांसाठी उत्साहाची, भक्तीची, आनंदाची पर्वणी ठरतात. वर्षभरात साजऱ्या होणाऱ्या अनेक सण व उत्सवांमधून स्थानिकांना जगण्याची नवी उर्जा मिळत असते. कोकणातील लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेले व अतीव उत्साहाने साजरे होणारे सण म्हणजे गणेशोत्सव व शिमगोत्सव. देशाच्या कानाकोपऱ्यातून रत्नागिरीवासी हे सण साजरे करण्यासाठी या काळात रत्नागिरीत पोहोचणारच. सण-उत्सवांच्या निमित्ताने भरणाऱ्या विविध यात्रा-जत्रांची वाट तर समस्त कोकणवासी पाहात असतात. या उत्साही वातावरणात सहभागी होऊन आपणही नवी उर्जा घेऊनच परततो. रत्नागिरी जिल्ह्यातील वाड्या-वस्त्यांमधून घरोघरी लाडक्या गणेशाचे आगमन होते आणि सकाळ संध्याकाळ समूहाने, साग्रसंगीत टाळ मृदंगाच्या साथीने म्हंटल्या जाणाऱ्या आरत्यांचे सूर वाड्यांमधून ऐकू येऊ लागतात. लाडक्या बाप्पांसाठी आपापल्या परीने घराघरांतून सुंदर आरास केलेली असते. तिसऱ्या दिवशी होणारे गौरींचे आगमन हा महिलावर्गासाठी एक आनंदाचा क्षण असतो. अतिशय हौसेने गौरी-गणपतीसाठी नैवेद्य आणि गोडाधोडाचे जेवण तयार केले जाते. श्री गणेशाचे आवडते उकडीचे मोदक, पुरणपोळी अशी पारंपरिक पक्वान्ने बनवली जातात. दहाव्या दिवशी होणारे 'गणेश विसर्जन' म्हणजे उत्साहाची व आनंदाची पर्वणी असते. वाडीतील घरांमधले गणपती गावातील एका विशिष्ट जागी एकत्र आणले जातात. ढोल, ताशांचा गजर दुपारपासूनच सुरू झालेला असतो. सर्व गणेशमूर्तींची सामूहिक आरती झाल्यावर आपापल्या बाप्पांची मूर्ती मोठ्या भक्तिभावाने डोक्यावर घेऊन गणेशभक्त विसर्जनासाठी सिद्ध होतात. वाडीतील आबालवृद्ध, महिलांची सायंकाळच्या सोनेरी उन्हात हिरव्याकंच भातशेतातून विविध वाद्यांच्या गजरात अनेकरंगी गुलालाची उधळण करत निघालेली विसर्जन मिरवणूक डोळ्यांचं पारणं फेडते. दहा दिवस हव्याहव्याशा वाटणाऱ्या या पाहुण्या गणेशाचा 'गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या' असे म्हणत थोड्या जड अंतःकरणानेच निरोप घेतला जातो.

  • होळी व शिमगोत्सव
    होळी व शिमगोत्सव

    होळी आणि गणेशोत्सव हे कोकणात मोठ्या प्रमाणावर साजरे केले जाणारे सण. हिवाळा ऋतू संपता संपता उन्हाळ्याची चाहूल देणारा होळी सण अर्थात शिमगोत्सव रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र अतिशय उत्साहात आणि पारंपरिक पध्दतीने साजरा केला जातो. समाजातील वाईट गोष्टी अग्निदेवतेच्या स्वाधीन करून त्या जाळून त्यांचे निर्दालन करणे हा होळी सणामागचा मूळ हेतू आहे. रत्नागिरीमध्ये होळी सण खूप वेगळ्या पध्दतीने साजरा होतो. सर्वसाधारणपणे आठ दिवस हा शिमगोत्सव सर्वत्र केला जातो. काही ठिकाणी पालख्या नाचवल्या जातात तो सोहळाही बघण्यासारखा असतो. गावातील सर्व गावकरी एकत्र येऊन प्रचंड उत्साहात व भक्तिभावाने पालखी सोहळा साजरा करतात. होळीच्या दिवशी एक मोठे माडाचे अखंड झाड शेकडो गावकरी मिळून पळवत नेतात आणि उंच उडवून झेलत होळीच्या माळावर आणतात. त्यानंतर जमिनीत खोल खड्डा करून त्यात झाड उभे केले जाते व त्यानंतर होळी पेटवली जाते. होळीमधे अग्निदेवतेला गोडाचे विविध पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. शिमगोत्सवाच्या या आठ दिवसांत रत्नागिरीत सर्वत्र खेळीमेळीचे वातावरण असते. एकमेकांच्या उखाळ्या-पाखाळ्या काढण्याचा, चेष्टामस्करी करण्याचा परवानाच जणूकाही सर्वांना मिळालेला असतो. त्यामुळे एकमेकांच्या नावाने फाका मारून म्हणजेच 'बोंबा मारून' गावकरी मनमुराद होळी सणाचा आनंद लुटतात.

  • नवरात्र
    नवरात्र

    भारतीय परंपरेत आदिशाक्तीला पूजण्याची प्रथा शतकानुशतके जपलेली आहे. उमा, पार्वती, गौरी, दुर्गा, महाकाली, चंडिका अशा विविध रूपातील देवींची मंदिरे आपल्याला अनेक ठिकाणी स्थापन केलेली दिसतात. रत्नागिरी जिल्ह्यातही केळशी येथील महालक्ष्मी, रत्नागिरी शहरातील भगवती देवी, आडिवरे येथील महाकाली, तुंबरव येथील शारदादेवी आणि गुहागर मधील दुर्गादेवी मंदिर अशा अनेक लहान-मोठ्या मंदिरातून घट बसवले जातात आणि शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात होते. मंदिरांना सुंदर सजवले जाते व दिव्यांची नेत्रदीपक रोषणाई केली जाते. रोज भजन, कीर्तन, गोंधळ याबरोबरच पारंपरिक जाखडी नृत्यही ठिकठिकाणी सादर केले जाते. या व्यतिरिक्त अनेकांकडे घरी नवरात्रोत्सव साजरा केला जातो. नवरात्रीच्या आठव्या दिवशी म्हणजे अष्टमीला शहरांमधून लुप्त झालेली घागरी फुंकायची प्रथा आजही रत्नागिरीत अनेक ठिकाणी बघायला मिळते. सर्व समाजाला एकत्र आणणारा रत्नागिरीतील हा अनोखा नवरात्रोत्सव कला, परंपरा, संस्कृती यांचे एकत्रित दर्शन घडविणारा आहे. स्त्री शक्तीचा जागर असणाऱ्या या उत्सवात देवीच्या समोर मातीचे जाड थर बनवून त्यामध्ये धान्य पेरले जाते. देवी म्हणजे माता किंवा जननी. नवनिर्मितीचे प्रतीक असलेली आदिशक्ती ही समाजातील असुर म्हणजेच वाईट शक्तींचा नाश करणारी आणि सत्प्रवृत्तींचे जतन करणारी आहे असे मानले जाते.

  • धनगरी नृत्य (गजा नृत्य )
    धनगरी नृत्य (गजा नृत्य )

    कोकणाची माती अनेक गुणांची उपज करणारी आहे. रत्नागिरी तर नावाप्रमाणे रत्नांची खाण आहे. जाखडी, धनगरी नृत्य, पालखी नृत्य अशी विविधता जोपासणारी व समाजजीवन वृद्धिंगत करणारी येथील नृत्यकला, पिढ्यानपिढ्या चालत आलेली गणेशमूर्ती कला व अनेक पारंपरीक कला-कौशल्यं जोपासणारे येथील स्थानिक कलाकार हे तर रत्नागिरीचं एक खास वैशिष्ट्य! निसर्गातच ज्यांचा भरपूर वावर आहे, निसर्गावर ज्यांचं जीवन अवलंबून आहे अशा धनगर समाजाचं निसर्गाशी असलेलं नातं त्यांच्या 'धनगरी नृत्यां' मधूनही व्यक्त होत राहातं.

  • मूर्ती कला
    मूर्ती कला

    उत्सवाच्या खूप अगोदर गणेशभक्तांनी नेहेमीच्या मूर्तीशाळेत आपल्याला हव्या त्या रूपातील गणेशमूर्तीची नोंदणी केलेली असते व त्यानुसार हे कुशल मूर्तीकार भक्तांच्या मनातील गणेशाला अक्षरशः मूर्त स्वरूपात उतरवतात. गणेशोत्सव जवळ आला की कोकणात सगळीकडे गडबड, लगबग सुरु होते. पुरुषमंडळी सजावटीसाठी खरेदी करण्यात मग्न असतात तर महिलावर्ग पक्वान्नांची तयारी करण्यात गुंतलेला असतो. परंतू लाडक्या गणेशाच्या आगमनाची पूर्तता गणेशमूर्तीकारांशिवाय कशी पूर्ण होणार? उत्सवाच्या खूप अगोदर गणेशभक्तांनी नेहेमीच्या मूर्तीशाळेत आपल्या मनासारख्या आवडत्या रूपातील गणेशमूर्तीची नोंदणी केलेली असते व त्यानुसार हे कुशल मूर्तीकार भक्तांच्या मनातील गणेशाला मूर्त रूपात साकारतात. मूर्तीकारांनी शाडूच्या मातीपासून बनविलेल्या गणरायाच्या मूर्त्या इतक्या जिवंत वाटतात की त्या पाहून नकळत हात जोडले जातात. अनेक पिढ्यांपासून श्रद्धेने केला जाणारा गणेशमूर्तीकलेचा हा व्यवसाय गणेशमूर्तीकारांना उत्पानाबरोबरच मानसिक समाधानही देऊन जातो.

  • जाखडी किंवा बाल्या नृत्य
    जाखडी किंवा बाल्या नृत्य

    गणेशोत्सव जवळ आला की सर्वत्र उत्साहाचे वातावरण तयार होते आणि मनाला नवी ऊर्जा देणाऱ्या पारंपरिक 'जाखडीचे' स्वर सगळीकडे घुमू लागतात

  • जल क्रीडा
    जल क्रीडा

    रत्नागिरी जिल्हा हा साहसवेड्यांसाठी एक उत्तम ठिकाण आहे. सायकलिंग, बायकिंग, पदभ्रमण, व्हॅली क्रॉसिंग, स्कुबा डायव्हिंग, जलक्रीडा असे अनेक साहसी क्रीडा प्रकार रत्नागिरीत विविध ठिकाणी अनुभवता येतात. आपल्या सवडीनुसार, आपल्याला परवडणारे, आनंद देणारे आणि मुख्य म्हणजे आपली साहसाची आवड भागविणारे हे क्रीडाप्रकार सर्व वयोगटातील पर्यटकांना कायमच खुणावत असतात रत्नागिरीतील अनेक समुद्रकिनाऱ्यांवर जलक्रीडेचा आनंद मनमुराद लुटता येतो. विविध बोट राईड्स बरोबरच बनाना राईड्स, वॉटर स्कूटर्स असे इतरही अनेक साहसी जलक्रीडाप्रकार इथे अनुभवता येतात. मुरुड, लाडघर, कर्दे, गणपतीपुळे, गुहागर, भाट्ये अशा अनेक किनाऱ्यांवर आबालवृद्धांपासून सर्वांना या जलक्रीडांचा मनमुराद आनंद लुटता येतो. लाटांवर स्वार होऊन वाऱ्याच्या वेगाने बोटीतून सफर करण्याचा अनुभव खूप रोमांचक असतो तर मित्रमैत्रिणींसकट बनाना राईड्सवर बसून पाण्यात डुबकी घेताना खूप मजा वाटते. संरक्षणाची सर्व काळजी घेऊन खेळले जाणारे हे जलक्रीडाप्रकार आपल्यात कुठेतरी लपलेले आपले अवखळ बालपण पुन्हा जागे करतात.

  • स्कूबा डायाव्हिंग
    स्कूबा डायाव्हिंग

    आपल्या अवतीभवती असलेले विविध प्राणी, पक्षी, वनस्पती, रंगीबेरंगी फुलपाखरे यांची दुनिया तर आपण नेहेमीच बघतो. परंतु 'जेवढे रानात आहे... तेवढेच पाण्यात आहे'. अथांग पसरलेल्या समुद्रातील अनोखी दुनिया निसर्गवेड्यांना कायमच आकर्षित करत आली आहे. या जलविश्वात अनेक आश्चर्ये दडलेली आहेत. या रंगीबेरंगी दुनियेची झलक बघण्याची सुवर्णसंधी रत्नागिरीतील मिऱ्या बंदर येथे आता उपलब्ध आहे.

  • सायकलिंग व बायकिंग
    सायकलिंग व बायकिंग

    रत्नागिरी जिल्ह्याची सायकलीवर सफर करणे हा एक विसरता न येणारा अनुभव आहे. नोव्हेंबर ते मार्च हा काळ सायकलीवरून भटकंतीसाठी उत्तम असतो. गुलाबी थंडी... धुक्यात लपेटलेली सकाळ.. कधी दाट झाडीतून, तर कधी प्रशस्त जांभ्याच्या सड्यांवरून, कधी दमछाक करणाऱ्या घाटरस्त्याने, तर कधी अथांग समुद्राला साक्षी ठेवत केलेली ही भटकंती संस्मरणीय ठरते. येथील बहुरंगी समाजजीवन अनुभवत, निसर्गाशी संवाद साधत सायकलीवरून रत्नागिरी जिल्ह्याची भटकंती एकदातरी करायलाच हवी. वाटेतील अनेक प्राचीन मंदिरे, गड-किल्ले, वेड लावणारे सागरतीर, कोळीजीवन, नारळी-सुपारीच्या बागा, टुमदार कोकणी गावं हे सर्व कॅमेऱ्यात साठवून आठवणींचा खजिना बरोबर घेऊन आपापल्या घरी परतावं....पुन्हा पुन्हा इथे येण्यासाठीच! वळणावळणाचे घाटरस्ते, आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर, कमी वर्दळीचे अंतर्गत रस्ते, वाटेत लागणाऱ्या खाडीपुलांवरून दिसणारे विहंगम दृश्य हे सर्व आपल्याला रत्नागिरी जिल्ह्याच्या मोटरसायकलवर केलेल्या भटकंतीमध्ये अनुभवता येईल. आपल्याला अचानक आलेल्या कोणत्याही अडचणीच्या वेळी इथला स्थानिक माणूस मदतीसाठी सदैव तत्पर असतो.

  • व्हॅली क्रॉसिंग
    व्हॅली क्रॉसिंग

    सुमारे २०० फूट खोल फेसाळत्या समुद्राच्या लाटा, समुद्रातील मासेमारी करणाऱ्या कोळ्यांच्या छोट्या बोटी या पार्श्वभूमीवर कड्याच्या एका टोकापासून जवळजवळ ९०० फूट दूर असणाऱ्या दुसऱ्या टोकास बांधलेल्या दोराच्या सहाय्याने दरी ओलांडण्याचा थरार अनुभवता येतो दोरीच्या सहाय्याने दरीवरून जाताना खोलवर खाली फेसाळणारा विशाल दर्या, हिरवीगार वनश्री, भाट्ये किनाऱ्यावर चालेलेली पर्यटकांची धमाल हे सर्व उंच हवेत लटकत असताना बघणे हा अनुभव थरारक असतो.

  • गिरीभ्रमण
    गिरीभ्रमण

    गिरीभ्रमण व पदभ्रमणासाठी रत्नागिरी जिल्हा हा एक उत्तम पर्याय आहे. पूर्वेला असणारा विशाल सह्याद्री पर्वतप्रेमींना कायम आव्हान देत असतो. रत्नागिरी जिल्ह्यात महिपतगड, सुमारगड, रसाळगड, प्रचीतगड असे अनेक डोंगरी किल्ले आहेत. तसेच लांजा तालुक्यातील नव्याने विकसित होत असलेले माचाळ हे ठिकाण तर पावसाळ्यात चुकवून चालत नाही. हिरव्या डोंगरराजीत धुक्याने वेढलेले माचाळ अवर्णनीय दिसते. पावसाळ्यात पाचू हिरवा सह्याद्री पांढऱ्याशुभ्र जलधारा लेऊन जणू स्वर्गीयच भासतो. मात्र या भटकंतीसाठी स्थानिक माहीतगार माणूस बरोबर असणे महत्त्वाचे.

राष्ट्रस्तरीय लिंक्स
  • सर्वोच्च न्यायालय, दिल्ली
  • भारत सरकार
  • पंतप्रधान कार्यालय
  • भारतीय निवडणुक आयोग
  • आधार कार्ड पोर्टल
  • मेरी सरकार पोर्टल
  • डीजीटल लॉकर पोर्टल
राज्यस्तरीय लिंक्स
  • मुंबई उच्च न्यायालय
  • महाराष्ट्र शासन
  • महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग
  • ग्रामविकास व पंचायत राज विभाग
  • आपले सरकार पोर्टल
  • महाटेंडर
जिल्हास्तरीय लिंक्स
  • विभागीय आयुक्त कार्यालय
  • जिल्हाधिकारी कार्यालय
  • रत्नागिरी पोलीस यंत्रणा
  • लाचलुचपत प्रतिबंधक केंद्र
  • रत्नागिरी नगर परिषद
  • महाऑनलाईन
  • Visitor Count : web counter

कॉपीराईट © 2021 जिल्हा परिषद रत्नागिरी. सर्व अधिकार राखीव.

Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | Hyperlinking Policy | Accessibility Statement | Disclaimer | Help

Last reviewed and updated on 20th April, 2021