बांधकाम विभाग - चिपळूण(चिपळूण/गुहागर/खेड/दापोली/मंडणगड)

अं.क्र.योजनाकालावधीमाहिती
1 खासदार स्थानिक विकास कार्यक्रम सदरची योजना केंद्र पुरस्कृत योजना आहे. मा. खासदार यांनी सुचविलेली स्थानिक गरजांवर आधारीत कामे हाती घेतली जातात. उदा. रस्ते (योजनेअंतर्गत व योजनेबाहय), पुल, सामाजिक व सांस्कृतीक सभागृह, शाळा कपौंड वॉल, समाजमंदीर, व्यायामशाळा, स्मशानशेड, सार्वजनिक शौचालय, स्वच्छतागृह शाळा गृह बांधकामे, ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय, खुला रंगमंच सार्व. वाचनालय, अंगणवाडया, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र बांधकामे, संरक्षक भिंती, एस.टी पिकअप शेड इत्यादी. सदर कामाचे अंदाजपत्रके जिल्हाधिकारी यांना सादर केली जातात. जिल्हाधिकारी यांनी प्रशासकिय मान्यता दिल्यानंतर निवीदा कार्यवाही पूर्ण करुन कामे पूर्ण केली जातात.
2 आमदार स्थानिक विकास कार्यक्रम या योजने अंतर्गत मा. आमदार महोदयांनी सुचविलेली स्थानिक गरजांवर आधारीत लहान स्वरुपांची लोकोपयोगी कामे हाती घेतली जातात. उदा. रस्ते (योजनेअंतर्गत व योजनेबाहय), पुल, सामाजिक व सांस्कृतीक सभागृह, शाळा कंपोउन्डवॉल, समाजमंदीर, व्यायामशाळा, स्मशानशेड, सार्वजनिक शौचालय, स्वच्छतागृह शाळा गृह बांधकामे, ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय, खुला रंगमंच, सार्व. वाचनालय, अंगणवाडया, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र बांधकामे, संरक्षक भिंती, एस.टी पिकअप शेड इत्यादी. सदर कामांचे अंदाजपत्रक करुन जिल्हाधिकारी यांचेकडे सादर केले जाते.जिल्हाधिकारी यांनी प्रशासकिय मान्यता दिल्यानंतर निवीदा कार्यवाही पूर्ण करुन कामे पूर्ण केली जातात.
3 डोंगरी विकास कार्यक्रम  सदरच्या योजने अंतर्गत संबंधीत तालुक्याचे मा.आमदार व पालकमंत्री यांच्या शिफारशीनुसार जिल्हा नियोजन समिती मार्फत कामे मंजूर करणेत येतात. यामध्ये रस्ते (योजनेअंतर्गत व योजनेबाहय), पुल, सामाजिक व सांस्कृतीक सभागृह, शाळा कपौंड वॉल, समाजमंदीर, व्यायामशाळा, स्मशानशेड, सार्वजनिक शौचालय, स्वच्छतागृह शाळा गृह बांधकामे, ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय, खुला रंगमंच, सार्व. वाचनालय, अंगणवाडया, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र बांधकामे, संरक्षक भिंती, एस.टी पिकअप शेड इत्यादी. सदर कामाचे अंदाजपत्रके जिल्हाधिकारी यांना सादर केली जातात. जिल्हाधिकारी यांनी प्रशासकिय मान्यता दिल्यानंतर निवीदा कार्यवाही पूर्ण करुन कामे पूर्ण केली जातात.
4 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सदरची योजना राज्य पुरस्कृत योजना आहे. या योजनेअंतर्गत नियमित रस्ते व खडीकरण करणे ही कामे प्राधान्याने होतात. स्थानिक मजूरांना रोजगार उपलब्ध करून दिला जातेा. या योजनेची अंमलबजावणी जिल्हा परिषदे मार्फत केली जाते. तालूकास्तरावर ग्रामसभेने सुचविलेली व पंचायत समितीने शिफारस केलेली कामे एकत्रित जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या मंजूरीने कामे मंजूर केली जातात. या योजनेअंतर्गत नोंदणीकृत मजूरांना मागणी नुसार किमान 100 दिवसांचा रोजगार उपलब्ध करुन दिला जातो. स्मशानभूमी अंगणवाडया, प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा अश्या गावा अंतर्गत व योजनाअंतर्गत व योजनाबाहय रस्त्यांचे मातीकाम, खडीकरण अश्या स्वरुपाची कामे या योजनेमध्ये हाती घेतली जातात.या योजनेअंतर्गत तालुकास्तरावर उपअभियंता यांचेकडून अंदाज पत्रके तयार करुन त्यांना गटविकास अधिकारी यांचेकडून प्रशासकिय मंजूरी दिल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येते.
5 जिल्हा वार्षिक योजना- 3054 (ग्रामीण रस्ते विकास व मजबूतीकरण) योजनेमध्ये 1981-2001 व 2001-21 च्या रस्ते विकास योजनेखाली जिल्हा रस्ते तसेच ग्रामीण मार्गावरील खालील प्रकारची कामे हाती घेतली जातात. 1. रस्ता सुधारणा 2. नविन रस्त्याची बांधकामे 3. पुलाची व जलनिस्सारणाची कामे 4.रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण. यासाठी शासन परिपत्रक क्र.जिवायो1007/प्रक्र39/का-1444 दि. 16.02.2008 नुसार मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत. आर्थिक वर्षामध्ये मंजूर नियतव्यया अधिन राहून दायित्वाची रक्कम वगळून उर्वरीत रक्कमेच्या दिडपट कार्यक्रम जिल्हा नियोजन समिती कडून मंजूर करणेत येतो. या योजनेअंतर्गत दिनांक 03.09.2016 च्या शासननिर्णयातील सुचना नुसार मुख्य मंत्री ग्राम सडक योजनेच्या Core Network यादीतील PCI व प्राधान्यक्रमानुसार कामे मंजूरीसाठी नियोजन विभागाकडे सादर केली जातात. जिल्हा परिषद लेखासंहितेनुसार रुपये 10.00 लक्ष पर्यंत प्रशासकिय मान्यता देणे व रुपये 1.00 कोटी पर्यंतचे तांत्रिक मंजूरी देणेचे अधिकार कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद व रुपये 25.00 लक्ष पर्यंतचे प्रशासकिय मान्यता देणेचे अधिकार मा.अति.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहेत. त्यानुसार मंजूर कामांना प्रशासकिय मान्यता व तांत्रिक मान्यता देऊन कामांची निवीदा कार्यवाही करुन कामे हाती घेतली जातात.
6 जि.प.इमारत बांधकाम दुरुस्ती /पुनर्जीवकरण कार्यक्रम शासकिय इमारत दुरुस्तीची कामे सन 1961 पूर्वी बांधलेल्या व शासनाच्या मालकीच्या असलेल्या इमारतींची दुरुस्तीची कामे हाती घेतली जातात. त्यासाठी मंजूर अनुदानाप्रमाणे आराखडा तयार करुन त्याला कार्यकारी अभियंता याचे स्तरावर जॉब क्र. प्रदान करुन मा. अति.मु.का.अ. यांचे स्तरावर मंजूरी देणेत येते. सदर कामाकरीता ग्राम विकास विभाग (बांधकाम-4) याचेमार्फत 1961 पर्यंतच्या इमारतींच्या दुरुस्तीचा निधी वितरित केला जातो. तसेच जिल्हा परिषद सेस मधून ही जि.प. इमारतीची दुरुस्ती केली जाते.
7 पंचायत समिती कार्यालय नविन बांधकामे या अंतर्गत पंचायत समिती कार्यालय प्रशासकिय इमारतींच्या नवीन बांधकामाकरीता शासन स्तरावर निधी उपलब्धता व प्रशासकिय मान्यतेस्तव प्रस्ताव सादर करण्यात येतात.
8 रस्ते दुरुस्ती व देखभाल - जिल्हा परिषद मालकीचे सर्व रस्त्याची देखभाल व दुरुस्ती करणे या मध्ये रस्त्यांचे डांबरीकरण, डावरी पृष्ठभगाचे नुतनिकरण खडीकरण, खडीच्या पृष्ठभागाचे नुतनीकरण, पूल व मो-यांची दुरूस्ती तसेच रस्त्यावरील खड्डे भरणे इत्यादी कामे या योजनेमार्फत हाती घेण्यात येतात. या कामांसाठी 3154 रस्ते, देखभाल व दुरुस्ती या लेखाशिर्षाखाली ग्रामविकास अनुदान प्राप्त होते. त्यांचेकडून अपलब्ध होण्याऱ्या अनुदानातून दुरुस्ती व देखभालीची कामे हाती घेण्यात येतात. गट- अ हा कार्यक्रम कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधाम यांच्या स्तरावर मंजूरी (जॉबक्रमांक) देतात व सदरची कामे जर कंत्राटदार नेमूनही कामे करावयाची असतीलतर त्याला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांची लेखी पूर्व परवानगी आवश्यक गट-ब व क ग्रामविकास विभाग (बांधकाम) मंत्रालय महाराष्ट्र शासन मुंबई यांच्या कडून मंजूरी मिळते, व गट-ड कार्यक्रम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या पूर्व सहमत्ती नंतर कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांचा स्तरावर मंजूर केली जाते.
9 गट ब- (रस्त्याचा दर्जा टिकविण्याची /सुधारण्याची कामे) या कार्यक्रमाला शासनाचे ग्राम विकास विभागाकडून मंजूरी देण्यात येते. रस्ते दुरुस्ती व परिरक्षण कार्यकमा अंतर्गत प्राप्त होणाऱ्या एकूण निधीच्या 70 टक्के किंमतीचा गट ‘ब’ कार्यक्रम करण्यात यावा असे शासन निर्णयामध्ये नमुद आहे. या गटाअंतर्गत रस्त्यांची विशेष दुरुस्ती/सुधारण, डांबरी नुतनीकरण, खडी नुतनीकरण, रुंदिकरण इत्यादि स्वरुपाचीकामे करण्यात येतात. गट ब कार्यक्रम अति.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेमार्फत शासनास सादर करण्यात येतो.
10 गट क- (विशिष्ठ प्रयोजनाची कामे ) या कार्यक्रमाला शासनाचे ग्राम विकास विभागाकडून मंजूरी देण्यात येते. रस्ते दुरुस्ती व परिरक्षण कार्यक्रमा अंतर्गत प्राप्त होणाऱ्या एकूण निधीच्या 10 टक्के किंमतीचा गट ‘क’ कार्यक्रम करण्यात यावा असे शासन निर्णयामध्ये नमुद आहे. या गटाअंतर्गत अपघात प्रवण क्षेत्राची सुधारणा, अभियांत्रिकी सुधारणा, कमकुवत तसेच मोठ्या पुलांची दुरुस्ती, गावे बारमाही रस्त्याने जोडण्यासाठी मुरमी रस्त्याचे खडीकरण करणे, गावे बारमाही रस्त्याने जोडण्यासाठी मोऱ्या व लहान रपट्यांची कामे, व लहान मोऱ्यांची सुधारणा इत्यादि स्वरुपाची कामे करण्यात येतात. गट ब कार्यक्रम अति.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेमार्फत शासनास सादर करण्यात येतो.
11 गट - ड :- अन्य व संकीर्ण हा कार्यक्रम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. यांच्या पूर्व सहमतीनंतर कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, बांधकाम विभाग यांच्या स्तरावर मंजूर करण्यात येतो. यामध्ये रस्त्याची देखभाल व दूरुस्ती अंतर्गत गट अ,ब व क मध्ये समाविष्ट नसणाऱ्या प्रकारची कामे घेण्यात येतात. गट ड (अन्य व संकिर्ण) रस्ते दुरुस्ती व परिरक्षण कार्यकमा अंतर्गत प्राप्त होणाऱ्या एकूण निधीच्या 5 टक्के किंमतीचा गट ‘ड’ कार्यक्रम करण्यात यावा असे शासन निर्णयामध्ये नमुद आहे.
12 आरोग्य विभागाकडील कामे- जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत आरोग्य विभागाकडील प्राथमिक आरोग्य केंद्र/ उपकेंद्र बांधकामे व विस्तारीकरण तसेच कंपौंडवॉल, परिसर सुधारणा, जोडरस्ते, अंतर्गत रस्ते व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र दुरुस्तीची कामे हाती घेतली जातात. अंदाजपत्रके जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांचेकडे प्रशासकिय मंजूरीसाठी सादर केली जातात. प्रशासकिय मान्यते नंतर निविदा कार्यवाही करुन कामे केली जातात.
13 13 वा वित्त आयोग 13 वा वित्त आयोग योजनेअंतर्गत स्थानिक गरजांवर आधारीत उदा. शाळा दुरुस्ती, स्मशान शेड दुरुस्ती, पाखाड्या, काँक्रिट गटारे बांधणे, रस्ता दुरूस्ती इत्यादी कामे केली जातात. जी कामे ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या मालकीची आहेत व त्यांचेकडे ज्या कामांच्या नोंदी आहेत अशीच कामे हाती घेण्याचे निर्देश आहेत. या योजनेमधील कामे मा. जि.प. सदस्य यांनी सुचविलेली निकषाधिन कामे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचेकडून मंजूर केली जातात.
14 जि.प.सेस योजना ग्रामीण रस्ते जिल्हा परिषद सेस या योजनेतुन रस्ते, मो-या, गटारे इत्यादी कामे हाती घेण्यात येतात. या योजनेची कामे जि.प. सदस्य यांनी सुचविलेली कामे मा. सभापती बांधकाम व मा. अध्यक्ष , जिल्हा परिषद यांचे शिफारशीनुसार कामे मंजूर होवुन , अनुदान जिल्हा उत्पन्नामधुन मंजूर होते. रक्कम रुपये 5.00 पर्यंतच्या कामांना तांत्रिक मान्यता उपअभियंता यांजकडून देणेत येते. तसेच रुपये 5.00 लक्ष वरिल कामांना मा. कार्यकारी अभियंता यांजकडून तांत्रिक व प्रशासकिय मान्यता देणेत येते.
15 क वर्ग पर्यटन विकास कार्यक्रम या योजनेअंतर्गत पर्यटन स्थळांच्या ठिकाणी उपलब्ध असणा-या सोयी-सुविधा तसेच पर्यटन स्थळ विकसीत करणेसाठी पर्यटकांच्या दृष्टीने आवश्यक असणारी कामे उदा. यात्रि निवास, बसण्याची बाकडी, पाखाडी, स्वच्छता गृहे इत्यादी कामे क वर्ग पर्यटन अंतर्गत घोषीत पर्यटन स्थळांपैकी मा. पालकमंत्री, मा. आमदार, मा. खासदार, विपस/विसस, जिल्हा नियोजन समिती, सदस्य व लोक प्रतिनिधींनी सूचविलेली कामे प्राधान्याने मा. पालकमंत्री यांचे शिफारशीनुसार मंजूर केली जातात. मंजूर कामांना तांत्रिक मंजूरी देऊन नियोजन विभागाकडे अंदाजपत्रके सादर केली जातात. तांत्रिक मंजूरी दिलेल्या कामांना जिल्हा नियोजन विभागाकडून प्रशासकिय मान्यता व प्रत्यक्ष निधी प्राप्त झालेल्या कामांची निवीदा कार्यवाही करुन कामे हाती घेतली जातात.
16 ग्रामीण यात्रा स्थळ या योजनेअंतर्गत यात्रा स्थळी निवास व्यवस्था, खाद्य गृहे, स्वच्छता गृहे, माहिती गृहे तसेच रस्ते, पाण्याची व्यवस्था इत्यादी पायाभूत सुविधांचा विकास करण्याची कामे केली जातात. ग्रामीण यात्रास्थळे क वर्ग अंतर्गत घोषित ग्रामीण यात्रा स्थळांपैकी मा. पालकमंत्री मा.आमदार, मा.खासदार, विपस/विसस, जिल्हा नियोजना समिती, सदस्या व लोक प्रतिनिधींनी सूचविलेली कामे प्राधान्याने जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागकडून मंजूर केली जातात. मंजूर कामांना तांविक मंजूरी देऊन ग्रामपंचायत विभागाकडे अंदाजपत्रके सादर केली विभागाकडून प्रशासकिय मान्यता व प्रत्यक्ष निधी प्राप्त झालेल्या कामांची निवीदा कार्यवाही करुन कामे हहाती घेतली जातात.
17 पशुसंवर्धन विभागाकडील कामे जिल्हा वार्षिक योजना व पशुवैद्यकिय दवाखाने मजबूतीकरण व बळकटीकरण योजनेअंतर्गत नवीन दवाखाने, कंपाऊड वॉल बांधकामे तसेच दुरुस्तीची कामे हाती घेतली जातात. अंदाजपत्रके जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांचेकडे प्रशासकिय मंजूरीसाठी सादर केली जातात. प्रशासकिय मान्यते नंतर निविदा कार्यवाही करुन कामे केली जातात.
18 महिला बाल कल्याण विभाग जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत नवीन अंगणवाडी बांधकामे तसेच दुरुस्तीची कामे हाती घेतली जातात अंदाजपत्रके जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी यांचेकडे प्रशासकिय मंजूरीसाठी सादर केली जातात. प्रशासकिय मान्यते नंतर निविदा कार्यवाही करुन कामे केली जातात.
19 शिक्षण विभाग  जिल्हा वार्षीक योजनेंतर्गत नवीन वर्गखोली बांधकामे तसेच शाळा दुरुस्तीची कामे हाती घेतली जातात अंदाजपत्रके शिक्षणाधिकारी शिक्षण विभाग,जिल्हा परिषद,रत्नागिरी यांचेकडे प्रशासकिय मंजूरीसाठी सादर केली जातात. प्रशासकिय मान्यते नंतर निविदा कार्यवाही करुन कामे केली जातात.
20 समाज कल्याण विभाग 1) गावांमधील मागासवर्गीय (SB,SC,ST,NT,VJNT) वाडयांमधील संरक्षकभिंत पाखाडया रस्ते,गटर इ. कामे या योजनेंतर्गत मंजूर केली जातात या कामांचे प्रस्ताव मागविणे व प्रशासकीय मंजूरी देणेची कार्यवाही समाजकल्याण विभागाकडून केली जाते. 2) समाजमंदिर- मागासवर्गीय वस्तीतील (SB,SC,ST, NT,VJNT) पेव्हर ब्लॉक, समाजमंदिर स्मारक किंवा समाज मंदिर परिसरातील कामे ही कामे समाजकल्याण विभागामार्फत मंजूर केली जातात.
अं.क्र.विभागप्रश्नउत्तर
1 बांधकाम विभाग योजना - चिपळूणग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण या योजनेचा निधी कोठून प्राप्त होते ?या योजनेचा निधी जिल्हा वार्षिक योजनेतून नियोजन विभागाकडून प्राप्त होतो.
2 बांधकाम विभाग योजना - चिपळूणक पर्यटन अंतर्गत निधी कोठून प्रप्त होता ?क पर्यटन अंतर्गत निधी नियोजन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय कडून प्राप्त होतो. जागा उपलब्धतेबाबतची कार्यवाही ग्रा.पं.कडून करणेत येते.
3 बांधकाम विभाग योजना - चिपळूणग्रामीण यात्रास्थळ य योजनेंतर्गत कामे कशी मंजूर होतात ?क वर्ग ग्रामीण यात्रास्थळ यादीतील जागा उपलब्धता निधी व निकषांना अधीन राहून ग्रामपंचायत विभागाकडून मंजूर केली जातात.
4 बांधकाम विभाग योजना - चिपळूणग्रामीण यात्रास्थळ अंतर्गत कामांना निधी कोठून प्रप्त होतो ?ग्रामीण यात्रास्थळ अंतर्गत कामांना निधी जिल्हा वार्षिक योजनेतून नियोजन विभागाकडून प्रप्त होतो. जागा उपलब्धतेबाबतची कार्यवाही ग्रा.पं.कडून करणेत येते.
5 बांधकाम विभाग योजना - चिपळूणबांधकाम विभाग योजने अंतर्गत पशुसंवर्धन विभागाकडील कामाची तरतूद मंजूर कधी होते ?प्रशासकीय आदेशानंतर निकषानुसार पशुसंवर्धन विभागाकडून कामासाठी बांधकाम विभागाला तरतूद मंजूर होते.
6 बांधकाम विभाग योजना - चिपळूणबांधकाम विभाग योजने अंतर्गत आरोग्य विभागाकडील कामे मंजूर तरतूदप्रशासकीय आदेशानंतर निकषानुसार कामासाठी बांधकाम विभागाला आरोग्य विभागामार्फत तरतूद मंजूर आहे.
7 बांधकाम विभाग योजना - चिपळूणग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण या योजने अंतर्गत कोणती कामे मंजुरीसाठी घेतली जातात ?या योजनेंतर्गत जिल्हा परिषदेकडील ग्रामीण रस्ते व इतर जिल्हा मार्ग रस्ते विकास योजना आराखड्यातील 2001-21 मधील रस्त्यांचे सर्वेक्षण करून पीसीआय आधारे वर्गीकरण करून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कोअर नेटवर्कच्या प्राधान्यक्रम यादीनुसार रस्त्यांची कामे मंजूर केली जातात.
8 बांधकाम विभाग योजना - चिपळूणग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण योजनेचा निधी मंजूर झालेवर खर्च करण्याची मुदत किती असतेज्या आर्थिक वर्षात निधी मंजूर होतो त्यावर्षी व त्याच्या पुढील आर्थिक वर्ष अखेरपर्यंत निधी खर्च करणे बंधनकारक आहे त्यामुळे कामे मुदतीत पूर्ण होणे आवश्यक आहेत.
9 बांधकाम विभाग योजना - चिपळूणआमदार / खासदार/डोंगरी विकास कार्यक्रम योजने अंतर्गत कोणत्या स्वरुपाची कामे हाती घेतली जातात ?या योजने अंतर्गत मा. आमदार महोदयांनी सुचविलेली स्थानिक गरजांवर आधारित लहान स्वरूपांची लोकोपयोगी कामे हाई घेतली जातात.उदा.रस्ते (योजनेअंतर्गत व योजनेबाह्य), पूल,मोरी व कॉजवे बांधकाम, सामाजिक व सांस्कृतिक सभागृह ,शाळा कंपौंड वॉल,समाजमंदिर .व्यायामशाळा ,स्मशानशेड ,सार्वजनिक शौचालय ,स्वच्छतागृह ,शाळा गृह बांधकामे,ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय,खुला रंगमंच,सार्व.वाचनालय ,अंगणवाड्या,संरक्षक भिंती,प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र बांधकामे,एस.ती पिकअप शेड इत्यादी स्वरुपाची कामे.
10 बांधकाम विभाग योजना - चिपळूणआमदार / खासदार/डोंगरी विकास कार्यक्रम योजनेअंतर्गत एखादे काम प्रस्तावित करणेसाठी कोणती कार्यवाही केली जाते ?सर्वप्रथम मा.आमदार महोदय वरील पैकी आवश्यक कामांचीमागणी मा.जिल्हाधिकारी यांचेकडे करतात. मा. जिल्हाधिकारी यांचेकडून कामांची छाननी करून त्या कामांचे अंदाजपत्रक तयार करणेसाठी संबंधित विभागाकडे (जिल्हा परिषद / सार्वजनिक बांधकाम विभाग) सूचना दिली जाते.
11 बांधकाम विभाग योजना - चिपळूणआमदार / खासदार/डोंगरी विकास कार्यक्रम योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करताना कोणती कागदपत्रे सोबत जोडणे आवश्यक आहे ?या योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करताना प्रथम सदर कामासाठी आवश्यक असणाऱ्या जागेची कागदपत्रे उदा. 1) शासनाच्या मालकीची जागा असल्यास 7/12 उतारा. 2) रस्ता किंवा पायवाट असल्यास जागेचा नकाशा व रस्ते विकास योजनेत सदरचा रस्ता अंतर्भूत असल्यास त्याचा क्रमांक किंवा ग्रा.पं.चा 26 नं. उतारा,3) खाजगी मालकीची जागा असल्यास जागेचे बक्षीसपत्र व 7/12 उतारा व जागेचा नकाशा 4) प्रत्यक्ष कामाच्या जागेचा क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी साक्षांकित केलेला फोटो 5) सदरचे काम इतर योजनेत समाविष्ट नसलेबाबत तसेच काम पूर्ण झाले
12 बांधकाम विभाग योजना - चिपळूणआमदार / खासदार/डोंगरी विकास कार्यक्रम योजनेचे प्रशासकीय मंजूरी व अनुदानसक्षम अधिकाऱ्यांनी तांत्रिक मंजूरी दिलेले सविस्तर अंदाजपत्रक व आवश्यक कागदपत्रे यासह परिपूर्ण प्रस्ताव मा.जिल्हाधिकारी यांजकडे प्रशासकीय मंजूरी व अनुदान प्राप्तीसाठी सादर करणेत येतो.
13 बांधकाम विभाग योजना - चिपळूणआमदार / खासदार/डोंगरी विकास कार्यक्रम योजनेत मा.जिल्हाधिकरी यांजकडून प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर कोणती कार्यवाही केली जाते ?सदर कामाच्या प्रस्तावास मा.जिल्हाधिकरी यांनी मंजूरी व 50 टक्के अनुदान दिल्यानंतर संबंधित विभागाकडून नियमानुसार निविदा निश्चिती करून मक्तेदारांना कामाचे आदेश दिले जातात. त्यानुसार कामाचे ठिकाणी संबंधित अभियंता यांचे मार्गदर्शनाखाली काम सुरु करणेत येऊन पूर्ण केले जाते. काम पूर्ण झाल्यानंतर कामाचे ठिकाणी कामाची माहिती दर्शविणारा फलक लावणेत येतो.
14 बांधकाम विभाग योजना - चिपळूणआमदार / खासदार/डोंगरी विकास कार्यक्रम योजनेत काम पूर्ण झाल्यानंतर कोणती कार्यवाही केली जाते ?काम पूर्ण झाल्यानंतर नावाचा फलक व पूर्ण झालेले काम स्पष्ट दिसेल अशा रीतीने काढलेला फोटो व काम पूर्णत्वाचा दाखला जोडनेत येऊन अनुदान मागणी मा.जिल्हाधिकरी यांजकडे केली जाते व अनुदान प्राप्त झाल्यानंतर सदरच्या अनुदानातून देयक खर्च टाकणेत येते व सदर पूर्ण झालेले काम देखभाल दुरुस्तीसाठी संबंधित यंत्रणेकडे हस्तांतरीत करणेत येते.
15 बांधकाम विभाग योजना - चिपळूणक वर्ग पर्यटन या योजनेंतर्गत कामे कशी मंजूर होतात ?क वर्ग अंतर्गत मंजूर पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी निधी व निकषांच्या अधीन राहून मंजूर आराखड्यातील कामे जागा शासकीय मालकीची उपलब्धता पाहून प्राधान्याने मंजूर केली जातात. नियोजन विभागाकडून कामे मंजूर होतात.
16 बांधकाम विभाग योजना - चिपळूणमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना अंतर्गत कामे मंजूर कशी केली जातात ?स्थानिक मजुरांना रोजगार उपलब्ध होणेसाठी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभेने सुचविलेली कामे पंचायत समितीने एकत्रित करून जि.प. स्तरावर पाठविली जातात. त्यानंतर जि.प. स्तरावर पूर्ण जिल्हाचा आराखडा तयार करून तस जि.प. च्या सर्वसाधरण सभेची मंजूरी घेऊन आराखडा मंजूर केला जातो.
17 बांधकाम विभाग योजना - चिपळूणमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना आराखड्यामध्ये कामे कोणत्या स्वरुपाची घेतली जातात ?नियमित रस्ते , रस्ते खडीकरण ,शौचालय बांधकामे, गुरांसाठी गोठव बंधने, कुक्कुट पालन शेड, शेळी पालन शेड, वैयक्तिक स्तरावरील कामे इ. प्रस्तावित केली जातात.
18 बांधकाम विभाग योजना - चिपळूणमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेची कामे केंव्हा सुरु केली जातात ?नोंदणीकृत मजुरांची पुर्शी मागणी प्राप्त झालेनंतर कामे सुरु केली जातात. तसेच काम मंजूर झालेनंतर व ग्रामपंचायती मार्फत मजुरांची यादी प्राप्त झालेवर तसेच ग्राम पंचायतीकडून हजेरी पत्रक घेतलेनंतर कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली जाते.
19 बांधकाम विभाग योजना - चिपळूणमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेची मुल स्वरूपाच्या रस्त्यांची कामे हाती घेणेसाठी करावयाची कार्यपद्धती कशी आहे ?रस्त्यांची कामे हाती घेणे पूर्वी रस्त्यासाठी जमीन उपलब्ध आहे अगर कसे याची खात्री केली जाते. जर जमीन खाजगी असल्यास त्यास संबंधित जमीन मालकाची संमती किंवा ग्रामपंचायत स्तरावर ब्क्शिस्प्त्राने जागा उपलब्धकेली जाते.
20 बांधकाम विभाग योजना - चिपळूणमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना मोठया प्रमाणात सदर योजना राबविण्यासाठी कोणती कार्यवाही करणेत येते ?ग्रामपंचायत स्तरावर सदर योजनेचा प्रचार व प्रसिद्धी ग्रामपंचायत व पंचायत समितीमार्फत केली जाते.
21 बांधकाम विभाग योजना - चिपळूणमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेत पेमेंट करावयाची कार्यपद्धती कशी आहे ?हजेरी पत्रक हे एका आठवड्याचे असते त्यानंतर प्राप्त हजेरी पत्रकाची बाब्निहाय अभियंत्यांकडून मोजमापे घेऊन मस्टर गट विकास अधिकारी यांचेकडे पाठविला जातो. त्यानंतर गट विकास अधिकारी यांचेकडून मजुरांचे पेमेंट बँक / पोस्ट ऑफीसमध्ये जमा केले जाते. ग्रामपंचायतीमार्फत हजेरी पत्रक सांभाळण्यासाठी व त्यावर नोंदी कण्यासाठी ग्रामरोजगार सेवक यांची नेमणूक ग्रामपंचायत पातळीवर करणेत येते.
22 बांधकाम विभाग योजना - चिपळूणमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेत कामावर मजूर म्हणून कोणाला घेता येते ?ज्याचेकडे ग्रामपंचायत मार्फत जॉबकार्ड आहे व ज्याचे पोस्टात अथवा राष्ट्रीयकृत बँकेत खाते आहे त्या मजुरांना कामावर घेतले जाते.
23 बांधकाम विभाग योजना - चिपळूणबांधकाम विभाग योजने अंतर्गत पशुसंवर्धन विभागाकडील कामे यांचे अंदाजपत्रक तयार करणेची कार्यपद्धती कशी आहे ?जिल्हा पशुसंवर्धन अधुकारी. जि.प. रत्नागिरी यांनी अंदाजपत्रके तयार करणे बाबत कळविल्यानंतर त्यानुसार उपअभियंता यांना सूचना देवून अंदाजपत्रके त्यांचेकडून तयार केली जातात. र.रु.5.00 लक्ष पर्यंत तांत्रिक मंजूरी उपअभियंता यांचेकडून दिली जाते व रु.5.00 लक्ष वरील कामांना कार्यकारी अभियंता यांचेकडून तांत्रिक मंजूरी दिली जाते.
24 बांधकाम विभाग योजना - चिपळूणबांधकाम विभाग योजने अंतर्गत पशुसंवर्धन विभागाकडील कामे मंजूर कशी केली जातात ?अंदाजपत्रकांना तांत्रिक मंजूरी देवून अंदाजपत्रके प्रशासकीय मंजुरीसाठी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांचेकडे पाठविली जातात.त्यानंतर त्यांचेकडून प्रस्तावित कामाला जागा उपलब्ध आहे अगर कसे याची खात्री करून त्याप्रमाणे शासन निकषानुसार प्रशासकीय मंजूरी दिली जाते.
25 बांधकाम विभाग योजना - चिपळूणबांधकाम विभाग योजने अंतर्गत पशुसंवर्धन विभागाकडील कामे केंव्हा सुरु केली जातात ?प्रशासकीय मंजुरीचा आदेश पशुसंवर्धन अधिकारी यांचेकडून प्राप्त झालेनंतर त्याची निविदा कार्यवाही करून कार्यारंभ आदेश देवून कामे सुरु होतात.
26 बांधकाम विभाग योजना - चिपळूणबांधकाम विभाग योजने अंतर्गत पशुसंवर्धन विभागाकडील कामाचे खर्च करण्याची कार्यपद्धतीनिविदा झालेनंतर मक्तेदार उपअभियंता, शाखा अभियंता यांचे मार्गदर्शनानुसार काम पूर्ण करतात.शाखा अभियंता केलेल्या कामाचे मोजमापे घेऊन मोजमाप पुस्तकात नोंद करून मोजमाप पुस्तक व देयक विभागीय कार्यालयास सादर केले जातात.विभागीय स्तरावर तपासणी अंती वित्त विभागाकडून केलेल्या कामाचे मूल्यांकनानुसार धनादेश दिले जातात.
27 बांधकाम विभाग योजना - चिपळूणबांधकाम विभाग योजने अंतर्गत आरोग्य विभागाकडील कामाचे अंदाजपत्रक तयार करणेची कार्यपद्धती कशी आहे ?जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. रत्नागिरी यांनी अंदाजपत्रके तयार करणे बाबत कळविल्यानंतर त्यानुसार उपअभियंता यांना सूचना देवून अंदाजपत्रके त्यांचेकडून तयार केली जातात. र.रु.5.00 लक्ष पर्यंत तांत्रिक मंजूरी उपअभियंतायांचेकडून दिली जाते व र.रु. 5.00 लक्ष वरील कामांना कार्यकारी अभियंता यांचेकडून तांत्रिक मंजूरी दिली जाते.
28 बांधकाम विभाग योजना - चिपळूणबांधकाम विभाग योजने अंतर्गत आरोग्य विभागाकडील कामे मंजूर कशी केली जातात ?अंदाजपत्रकांना तांत्रिक मंजूरी देवून अंदाजपत्रके प्रशासकीय मंजुरीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेकडे पाठविली जातात.त्यानंतर त्यांचेकडून प्रस्तावित कामाला जागा उपलब्ध आहे अगर कसे याची खात्री करून त्याप्रमाणे शासन निकषानुसार प्रशासकीय मंजूरी दिली जाते.
29 बांधकाम विभाग योजना - चिपळूणबांधकाम विभाग योजने अंतर्गत आरोग्य विभागाकडील कामे केंव्हा सुरु केली जातात ?प्रशासकीय मंजुरीचा आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेकडून प्राप्त झालेनंतर त्याची निविदा कार्यवाही करून कार्यारंभ आदेश देवून कामे सुरु होतात.
30 बांधकाम विभाग योजना - चिपळूणबांधकाम विभाग योजने अंतर्गत आरोग्य विभागाकडील कामाची खर्च करण्याची कार्यपद्धतीनिविदा झालेनंतर मक्तेदार उपअभियंता , शाखा अभियंता यांचे मार्गदर्शनानुसार काम पूर्ण करतात.शाखा अभियंता केलेल्या कामाचे मोजमापे घेवून मोजमाप पुस्तकात नोंद करून मोजमाप पुस्तक विभागीय कार्यालयास सादर केले जातात.विभागीय स्तरावर तपासणी अंती वित्त विभागाकडून केलेल्या कामाचे मूल्यांकनानुसार धनादेश दिले जातात.
31 बांधकाम विभाग योजना - चिपळूणसर्व साधारण ठेकेदार यांचे करीता काय कागद पत्र आवश्यक आहेत?वर्षात पुर्ण झालेली कामे 6) प्रगतीपथावरअसलेली कामे. 7) आयकर विवरण पत्रे दाखला पोच मागील तीन वर्षाचे,लेखापरिक्षीत नफा तोटा ताळेबंदासह. 8) विक्रीकर दाखला छायांकित प्रत. 9) व्यावसायिक नोंदणी प्रमाणपत्र व अद्यावत चलने छायांकित प्रत. 10) नोंदणी शुल्क वर्गवारी प्रमाणे. 11) 100/-बॉंडपेपरवर नोटरी सक्षम शासकीय/निमशासकीय किंवा खाजगी सेवेत नसल्याबाबत.तसेच ठेकेदारांच्या काळ्या यादीत नाव नसल्याबाबत.प्रतिज्ञा पत्र.
32 बांधकाम विभाग योजना - चिपळूणसुशिक्षित बेरोजगार अभियंता यांना ठेकेदार नोंदणी करीता कुठली कागदपत्रे आवश्यक आहेत ?1) अर्हता प्राप्त केल्यापासून 10 वर्षाचे आत नमुन्यातील अर्ज सादर करणे. 2) पासपोर्ट आकाराचे 3 फोटो त्या पैकी एक फोटो राजपत्रित अधिकारी यांनी स्वाक्षांकित केलेला असावा. 3) सिव्हील इंजिनियर डिप्लोमा डिग्री प्रमाणपत्राची छायांकित प्रत. 4) शेवटच्या वर्षाचे गुणपत्रकांची छायांकित प्रत. 5) रहिवासी दाखला. 6) एम्प्लॉयमेंट नोंदणी प्रमाणपत्रकाची छायांकित प्रत. 7) पतदारी प्रमाणपत्र शेड्यूल बँकेचे र.रु.300000/- 8) नोंदणी फी रक्कम रुपये 7500/- भरल्याचे चलन 9) 100/- रु. बॉंडपेपरवर नोटरी समक्ष प्रतिज्ञापत्र.त्यामध्ये शासकीय,निमशासकीय किंवा खाजगी सेवेतत नसल्यासबाबत. व अन्यत्र ठेकेदार म्हणून नोंदणी केली नसल्याबाबत . अन्य ठेकेदार नोंदणी प्राधिकरणाकडे ठेकेदारांचे काळ्या यादीत नाव नसल्याबाबत. उच्च शिक्षणाकरीता प्रवेश घेतला नसलेबाबत नमुद असणे आवश्यक आहे.
33 बांधकाम विभाग योजना - चिपळूणमजूर सहकारी संस्थेसाठी काय कागदपत्र आवश्यक आहेत?मजूर सहकारी संस्थेकरीता खालील कागदपत्रे आवश्यक आहेत. 1) अर्ज 2) भागभांडवल यादी 3) लेखा ऑडिट 4) संस्था अस्तित्वात असल्याचा कालावधी 5) संस्था महासंघाशी सलग्न असल्याचा महासंघाचा दाखला 6) संस्थेकडे तांत्रिक सल्लागार असावा 7) संस्थेने केलेली कामे,व त्याचा दाखला 8) संस्थेकडे कामासाठी असणारेआवश्यक बांधकाम साहित्याची यादी 9) सभासदांचे ओळखपत्राची छायांकित प्रत 10) उपनिबंधक यांचे शिफारस पत्र 11) नोंदणी शुल्क र.रु.5000/- मात्र 12) काळ्यायादीत नसल्याबाबतचे 100/- बॉंडपेपरवर प्रतिज्ञापत्र
34 बांधकाम विभाग योजना - चिपळूणबांधकाम विभागाकडील कामे मंजूर झाल्यानंतर काय कार्यवाही केली जाते ?बांधकाम विभागाकडील मंजूर झालेले काम प्रथम ग्रामपंचायतीना लेखी पत्राद्वारे कळविण्यात येते व त्यामध्ये 10 दिवसांची मुदत दिली जाते.त्या मुदतीत ग्रामपंचायतीकडून काम मागणी प्रस्ताव सादर केला तर ते काम ग्रामपंचायतीला दिले जाते. व दिलेल्या मुदतीत प्रस्ताव किंवा मागणी पत्र प्राप्त झाले नाही तर सदरचे काम हे काम वाटप समिती मध्ये वाटप केले जाते. त्यामध्ये 33:33:34 टक्के प्रमाणे वाटप केले जातात. 33 टक्के सु.बे. अभियंता 33 टक्के मजूर सहकारी संस्था, 34 टक्के खुली निविदा यांना वाटप केली जातात.खुली निविदाची कामे ही वर्तमान पत्रामध्ये प्रसिद्ध केली जातात.व 3 लक्षाचे आतील कामांचे वाटप केले जाते व 3 लक्षावरील कामांचे ई निविदा केली जाते.
अं.क्र.पदांचे नावमंजुर पदेभरलेली पदेरिक्त पदे
1 कार्यकारी अभियंता101
2 उप अभियंता514
3 कनिष्ठ अभियंता1378255
4 प्रमुख आरेखक110
5 कनिष्ठ आरेखक1028
6 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक33924
7 मेस्त्री श्रेणी-1303
8 मेस्त्री श्रेणी-2101
9 वरिष्ठ यांत्रिकी101
10 अनुरेखक110
11 कनिष्ठ यांत्रिकी101
12 तारतंत्री110
13 जोडारी101
14 चौकीदार12120
15 रस्ता रुळ चालक202
अं.क्र.कार्यालयाकडून पुरवली जाणारी सेवाकर्मचारी/अधिकाऱ्याचे नावआवश्यक कागद पूर्तता केल्यानंतर किती कालावधीत सेवा पुरवली जाईलसेवा कालावधीत पुरवली न गेल्यास ज्याच्या कडे तक्रार करता येईल तो अधिकारी
1 आमदार स्थानिक विकास कार्यक्रम या योजनेंतर्गत मा.आमदार महोदयांनी सुचविलेली स्थानिक गरजांवर आधारीत लहान स्वरुपांचि लोकोपयोगी कामे हाती घेतली जातात. कार्यकारी अभियंता-30 दिवसमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
2 खासदार स्थानिक विकास कार्यक्रम सदरची योजना केंद्र पुरस्कृत योजना आहे. मा. खासदार यांनी सुचविलेली स्थानिक गरजांवर आधारीत कामे हाती घेतली जातात. कार्यकारी अभियंता-30 दिवसमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
3 डेांगरी विकास कार्यक्रम - सदरच्या योजनेंतर्गत संबंधी तालुक्याचे मा.आमदार व पालकमंत्री यांच्या शिफारशीनुसार जिल्हा नियोजन समिती मार्फत कामे मंजूर करणेत येतात. कार्यकारी अभियंता-30 दिवसमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
4 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना- सदरच्या योजनेंतर्गत बांधकाम विभागामार्फत नियमित रस्ते व खडीकरण करणे ही कामे प्राधान्याने होतात.कार्यकारी अभियंता-30 दिवसमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
5 13 वा वित्त आयोग- 13 वा वित्त आयोग योजनेंतर्गत स्थानिक गरजांवर आधारीत उदा. शाळादुरुस्ती स्मशानशेड दुरुस्ती,पाखाडया क्राँक्रीट गटारे बांधणे,रस्ता दुरुस्ती इ. कामे केली जातात.कार्यकारी अभियंता-30 दिवसमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
6 जिल्हा वार्षिक योजना- इतर जिल्हा मार्ग व ग्रामीणमार्गावरीलखडीकरण, डांबरीकरण मोऱ्या बांधणे इ.कामे या योजनेंतर्गत हाती घेण्यात येतात.कार्यकारी अभियंता-30 दिवसमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
7 रस्ते दुरुस्ती व देखभाल- जिल्हा परिषद मालकीचे सर्व रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती करणे या मध्ये रस्त्यांचे डांबरीकरण, डांबरी पृष्ठभागाचे नुतनीकरण, देखभाल व खडीकरण, खडीच्या पृष्ठभागाचे नुतनीकरण, पूल व मोऱ्यांची दुरुस्ती तसेच रस्त्यावरील खड्डे भरणे इ.कामे या योजनेमार्फत हाती घेण्यात येतात.कार्यकारी अभियंता-30 दिवसमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
8 जिल्हा परिषद सेस- जिल्हा परिषद सेस या योजनेतून रस्ते, मोऱ्या,गटारे इत्यादी कामे हाती घेण्यात येतात. या योजनेची कामे जि.प.सदस्य यांनी सुचविलेली कामे मा.सभापती बांधकाम व मा.अध्यक्ष,जिल्हा परिषद यांचे शिफारशीनुसार कामे मंजूर होवून,अनुदान जिल्हा उत्पन्नातून मंजूर होते. कार्यकारी अभियंता-30 दिवसमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
9 आरोग्य विभागाकडील कामे- जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत आरोग्य विभागाकडील प्राथमिक आरोग्य केंद्र/उपकेंद्र बांधकामे व विस्तारीकरण तसेच कंपाउंडवॉल,परिसर सुधारणा जोडरस्तेअंतर्गत रस्ते, अंतर्गत रस्ते व प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र दुरुस्तीची कामे हाती घेतली जातात.कार्यकारी अभियंता-30 दिवसमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
10 पशुसंवर्धन विभागाकडील कामे- जिल्हा वार्षिक योजना व पशुवैद्यकीय दवाखाने मजबुतीकरण व बळकटीकरण योजनेअंतर्गत नवीन दवाखाने,कंपाउंडवॉल बांधकामे तसेच दुरुस्तीची कामे हाती घेतली जातात.कार्यकारी अभियंता-30 दिवसमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
11 पुरप्रतिबंधक योजना- या योजनेंतर्गत भविष्यात पुरामुळे किंवा अन्य नैसर्गिक कारणामुळे अपाय होवू नये याची कामे हाती घेतली जातात.कार्यकारी अभियंता-30 दिवसमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
12 शासकीय इमारती दुरुस्ती- शासकीय इमारत दुरुस्तीची कामे सन 1961 पूर्वी बांधलेल्या व शासनाच्या मालकीच्या असलेल्या इमारतींची दुरुस्तींची कामे हाती घेतली जातात.कार्यकारी अभियंता-30 दिवसमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
13 पंचायत समिती कार्यालय नवीन बांधकामे- या अंतर्गत पंचायत समिती कार्यालय प्रश्यासकीय इमारतींच्या नवीन बांधकामाकरिता शासन स्तरावर निधी उपलब्धता व प्रशासकीय मान्यतेस्तव सादर करणेत येतात.कार्यकारी अभियंता-30 दिवसमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
14 निविदा स्विकृती करणे (कागदपत्रांच्या पुर्ततेनंतर) रक्कम रु. 1,00,000/- ते 10,00,000/-कार्यकारी अभियंता-10 दिवसमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
15 कार्यालयीन कामकाजावर पर्यवेक्षणरिक्त--कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी
16 कार्यालयीन कामकाजावर पर्यवेक्षणश्री. किरण वाडेकर-कनिष्ठ-कनिष्ठ प्रशासन अधिकारी-कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी
17 1) पशुसंबर्धन विभागाकडील योजना 2) आरोग्य विभागाकडील योजना 3) पंचायत समिती इमारती बांधकामे व शासकिय इमारती बांधकामे वेळोवेळी कार्यालयीन प्रमुखांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे. 4) जिल्हा वार्षिक योजना ( रस्ते व साकव ) 5) कोकण ग्रामिण पर्यटन 6) ठक्कर बाप्पा आदिवासी विकास योजना 7) आपले कार्यालयाकडील अभिलेख तयार करणे. वेळोवेळी कार्यालयीन प्रमुखांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे.श्रीम.व्ही.आर. सावंतदेसाई शाखाअभियंता पी.बी.1-विहीत मुदतीतकार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी
18 1) पशुसंबर्धन विभागाकडील योजना 2) आरोग्य विभागाकडील योजना 3) पंचायत समिती इमारती बांधकामे व शासकिय इमारती बांधकामे वेळोवेळी कार्यालयीन प्रमुखांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे. 4) जिल्हा वार्षिक योजना ( रस्ते व साकव ) 5) कोकण ग्रामिण पर्यटन 6) ठक्कर बाप्पा आदिवासी विकास योजना 7) आपले कार्यालयाकडील अभिलेख तयार करणे. वेळोवेळी कार्यालयीन प्रमुखांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे.श्रीम.व्ही.आर.-सावंतदेसाई शाखा अभियंता पी.बी.1विहीत मुदतीतकार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी
19 1)दक्षता व गुण नियंत्रण मुद्यांची पुर्तता करणे. 2) 2515 मुलभूत सुविधा कार्यक्रम.3) जिल्हा परिषदेच्या इमारतींचे निर्लेखन 4) अंगणवाडी इमारत बांधकामे /शाळागृह शिक्षण विभागाकडील योजना 5) 17 सामुहिक योजना 6) जनसुविधा कार्यक्रम 7) नागरी सुविधा कार्यक्रम 8) ग्रामपंचायत निधी अंतर्गत कामे. 9) ग्रामसेवक निवासस्थाने 10) 13 वा वित्त आयोग / जिपस्तर /पंसस्तर 11) आदर्श गाव योजना /सांसद आदर्श गाव योजना 12) महाराष्ट्र ग्रामिण /नरेगा 13) कोयना भुकंप योजना 14) अल्पसंख्याक योजना 15) / जि.प सेस शिक्षण/ महिला बालकल्याण 16) पुनर्वसन निधी योजना 17) सरोवर संवर्धन योजना 18) स्वच्छ भारत मिशन ग्राम.सर्व शौचालय अंदाजपत्रक मागणी प्रस्ताव 19) आपले कार्यालयाकडील अभिलेख तयार करणे. वेळोवेळी कार्यालयीन प्रमुखांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे.श्रीम. आर.आर.राणे-कनिष्ठ अभियंता पी.बी.3विहीत मुदतीतकार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी
20 1)खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम. 2) आमदारांचा (विधानसभा / विधान परिषद ) स्थानिक विकास कार्यक्रम 3) डोंगरी विकास कार्यक्रम. 4) 20%समाजकल्याण / नवबौध्द घटकांचा विकास कार्यक्रम.5) अपंग कल्याण निधी 6) तांडा वस्ती सुधार योजना 7) डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना 8) आपले कार्यालयाकडील अभिलेख तयार करणे. वेळोवेळी कार्यालयीन प्रमुखांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे.श्रीम.ए.व्ही.मांजरेकर-शाखाअभियंता पी.बी.2 कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी
21 1)रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रम गट.ब व क. 2) रस्ते दुरुस्ती कार्यक्रम अ व ड 3)पुरहानी दुरुस्ती कार्यक्रम 4) इमारत दुरुस्ती कार्यक्रम. 5) रस्ते इमारती यांची माहिती अद्यावत करणे. 6) गौण खनिज अंतर्गत कार्यक्रम. 7) पुरप्रतिबंधक उपाय योजना 8) इमारत भाडे प्रकरण 9) रस्ते विकास योजना 10) ग्रामिण यात्रास्थळ विकास कार्यक्रम (तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रम. ) 11) क वर्ग पर्यटन विकास कार्यक्रम. (पर्यटन विकास कार्यक्रम ) 12) जिल्हा परिषद सेस 13) ब वर्ग प्रस्ताव 14) आपले कार्यालयाकडील अभिलेख तयार करणे. वेळोवेळी कार्यालयीन प्रमुखांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे.श्री.एस.एम.कांबळे-आरेखक डी.एम.विहीत मुदतीतकार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी
22 1)मालमत्ता संबंधी नोंदवहया 39,40,41 अद्यावत करणे. 2) विधानमंडळ कामककाजाशी संबंधीत तारांकीत प्रश्न/कपात सुचना. 3) रोडचार्ट अ,ब,क, अदयावत करणे. 4) बिनशेती प्रकरण नाहरकत दाखले. 5) जि.प.स्तरावर एस.टी.वाहतुक करणेबाबत दाखले. 6)रस्त्यांवरील अतिक्रमणाबाबत कार्यवाही .7) राज्य माहिती संचिका 8) रस्ते दुरुस्ती संदर्भात संपुर्ण पत्र व्यवहार व संकिर्ण.9) रस्ते सांख्यिकी माहिती. 10) इमारत भाडे प्रकरण 11)आपले कार्यालयाकडील अभिलेख तयार करणे. वेळोवेळी कार्यालयीन प्रमुखांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे.श्री.पी.जे.कांबळे-कनिष्ठ आरेखक डी.एम.-1विहीत मुदतीतकार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी
23 लेखा विषयक सर्व कामांची पर्यवेक्षण व नियंत्रण करणे.श्री.एन.एम.बोधनकर-सहा.लेखाधिकारी कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी
24 रोखपाल विषयक कामकाजश्री.ए.एस.टापरे-कनिष्ठ सहाय्यकदररोजकार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी
25 1) सर्व आस्थापना/योजनांचे बजेट 2) आस्थापना अनुदान तालुकास्तरावर वितरीत करणे,तालुक्यांचा खर्चाचा ताळमेळ घेणे,नोंदवहया अद्यावत ठेवणे,उपयोगिता प्रमाणपत्र पाठविणे 3)अधिक्षक अभियंता यांचेकडे अनुदान मागणी अंदाजपत्रके सादर करणे 4) आपले कार्यासनाकडील अभिलेख तयार करणे 5) वेळोवेळी कार्यालयीन प्रमुखांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे.श्रीम.एस.आर.घावट-वरिष्ठ सहाय्यक अे.4विहीत मुदतीतकार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी
26 1) र.रु.3.00 लक्ष वरी सर्व योजनांतर्गत कामांच्या निविदा प्रसिध्दीबाबत परिपूर्ण कार्यवाही करणे 2) निविदा मंजूरी व कामांचे आदेशपत्र तयार करणे 3) अनामत रक्कम परत करणे,रजिस्टर अद्यावत करणे 5)आपले कार्यासनाकडील अभिलेख तयार करणे 6)वेळोवेळी कार्यालयीन प्रमुखांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे.श्री. एन.एन.पाणिंद्रे-वरिष्ठ सहाय्यक अे.1 टेंडर -1विहीत मुदतीतकार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी
27 1)र.रु.3.00 लक्ष पर्यतच्या कामांची निविदा प्रसिध्दीबाबत परिपूर्ण कार्यवाही करणे,निविदा मंजूरी व कामांचे आदेश तयार करणे 2)अनामत रक्कम परत करणे, रजिस्टर अद्यावत करणे 3) कामवाटप समितीच्या कामांची यादीबाबतचे सर्व कामकाज 4) दापोली तालुक्यातील कामांची देयके तपासणे,कामचे मक्ते रद्द करणे,मुदतवाढ प्रस्ताव,कामांची प्रगती नोंदवही अद्यावत करणे इ.संबधीत सर्व कामे. 5) कामांची प्रगती नोंदवही अद्यावत करणे 6)आपले सरकार 7) मा.जिल्हाधिकारी यांचेकडील २४/७ च्या तक्रारीवर कार्यवाही करणे 8)आपले कार्यासनाकडील अभिलेख तयार करणे 9)वेळोवेळी कार्यालयीन प्रमुखांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे.श्रीम.ए.के.कणिरे-कनिष्ठ सहाय्यक अे. 3 टेंडर -2 कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी
28 1) कालेलकर आस्थापना विषयक सर्व कामे अहवाल सादर करणेसहीत. 2) खेड व चिपळूण तालुक्यातील कामांची देयके तपासणे,कामचे मक्ते रद्द करणे,मुदतवाढ प्रस्ताव,कामांची प्रगती नोंदवही अद्यावत करणे इ.संबधीत सर्व कामे 3)ई- निविदा कार्यासनाचे कामकाम पहाणे 4)आपले कार्यासनाकडील अभिलेख तयार करणे 5)वेळोवेळी कार्यालयीन प्रमुखांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे.श्री.पी. जे.हरजकर-कनिष्ठ सहाय्यक कार्यासन.अे-2 कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी
29 1)बांधकाम विभाग चिपळूण/रत्नागिरी व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडील तांत्रिक कर्मचारी आस्थापना विषयक सर्व कामे, अहवाल सादर करणेसहीत 2) बिंदू नामावली 3) पदभरती 3)पदोन्नती 4)आश्वासित प्रगती योजना, 5)सर्व प्रकारच्या बदली बाबतची कामे 6)सेवा जेष्ठता यादी 7)खातेनिहाय / विभागीय चौकशी /न्यायालयीन चौकशी 8)आपले कार्यासनाकडील अभिलेख तयार करणे 9) वेळोवेळी कार्यालयीन प्रमुखांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणेश्रीम. पी. पी. बनप-कनिष्ठ सहाय्यक सी.1विहीत मुदतीतकार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी
30 1) बांधकाम विभाग चिपळूण विभागाकडील सर्व कर्मचा-यांची आस्थापना विषयक सर्व कामे (3 ते 4), अहवाल सादर करणेसहीत 2) वर्ग 1 व वर्ग-3 ची आस्थापना विषयक सर्व कामे,अहवाल सादर करणेसहीत. 3) वर्ग 3 व 4 चे पगार देयके 4)आपले कार्यासनाकडील अभिलेख तयार करणे 5)वेळोवेळी कार्यालयीन प्रमुखांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे.श्रीम.एस.एस.कांबळे-वरिष्ठ सहाय्यक सी.2विहीत मुदतीतकार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी
31 1) सेवानिवृत्तीनंतर संबंधित सेवानिवृत्ती कर्मचारी यांचे सेवानिवृत्ती प्रकरण,भ.नि.नि.प्रकरण,रजारोखीकरण,गट विमा योजना प्रकरण या सर्व लाभ विषयक कामकाज पहावयाचे आहे.( वर्ग1 ते 4) 2) वैदयकीय प्रतिपूर्ति देयके (वर्ग 1 ते 4) 3)दैनंदिनी 4)कर्मचारी गणना,सांख्यिकी माहिती 5)आपले कार्यासनाकडील अभिलेख तयार करणे 6) वेळोवेळी कार्यालयीन प्रमुखांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे.श्रीम.एन.पी. शिवलकर-कनिष्ठ सहाय्यक कार्यासन क्र. सी.3विहीत मुदतीतकार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी
32 1) स्थानिक लेखा तपासणी अहवाल/महालेखाकार प्रकरणे 2) मा.आयुक्त तपासणी / मा.मुख्य कार्यकारी अधिकारी तपासणी मुद्दे 3)कर्मचारी दप्तर तपासणी व विभागीय तपासणी (बांधकाम विभाग चिपळूण यांनी करावयाची तालुकास्तरीय तपासणी 4)पंचायत राज समिती 5) भार - अधिभार प्रकरणे 6) राजीव गांधी प्रशासकीय गतिमान अभियान 7) कार्यालयीन जंगम मालमत्ता पडताळणी करणे,नोंदवही अद्यावत करणे,दाखला देणे 8) वर्गीकरण केलेले अभिलेख ताब्यात घेणे अभिलेख कक्ष सुस्थितीत ठेवणे ,नोंदवही अद्यावत करणे 9) नियतकालिके/स्थायी आदेश संकलने एकत्रित नोंदवही 10) मासिक अहवाल 11)आपले कार्यासनाकडील अभिलेख तयार करणे 12)वेळोवेळी कार्यालयीन प्रमुखांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे.श्रीम.डी.एम.नागवेकर-वरिष्ठ सहाय्यक(लि) कार्यासन क्र. सी.4विहीत मुदतीतकार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी
33 1) जिल्हा परिषदेशी संबधीत असलेल्या सर्व सभांची माहिती संकलीत करणे व अदयावत करणे 2) मंडणगड व गुहागर तालुक्यातील कामांची देयके तपासणे,कामचे मक्ते रद्द करणे,मुदतवाढ प्रस्ताव, कामांची प्रगती नोंदवही अद्यावत करणे इ.संबधीत सर्व कामे.3) रोजगार हमी योजना सर्व कामकाज (तात्रिक बाबी वगळूण,4) मंत्री महेादय दौरा कार्यक्रम 5) विश्रामगृह आरक्षण/जिल्हाबाहेरील प्रवासाला मंजूरी देणे,नोंदवही अदयावत करणे 6)वार्षिक प्रशासन अहवाल 7) तर लिलाव 8) जनता दरबार/मान्सून कार्यक्रम 9) लोकशाही दिन 10) आय.एस.ओ.11) भू संपादन 12) आपले कार्यासनाकडील अभिलेख तयार करणे 13) वेळोवेळी कार्यालयीन प्रमुखांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे.श्री.व्ही. एन. वळवी-वरिष्ठ सहाय्यक सी.5विहीत मुदतीतकार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी
34 1)आवक - जावक बारनिशी 2) आवक पत्राबाबतच्या सर्व एकत्रिकरण नोंदवहया अद्यावत करणे 3) स्टॅप अकौंट, पी.आर. A व पी.आर.B रजिस्टर अद्यावत करणे 4)दुरध्वनी नोंदवही अद्यावत करणे 5)माहितीचा अधिकार अर्ज वितरीत करणे व गोषवारा तयार करणे,रजिस्टर अद्यावत करणे 6) कार्यालयीन स्टेशनरी खरेदी व वितरीत करणे,कार्यालयाला आवश्यक साहित्य,यंत्रे खरेदी करणे 7) सादिल देयके तयार करणे 8)आपले कार्यासनाकडील अभिलेख तयार करणे 9) वेळोवेळी कार्यालयीन प्रमुखांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे.श्री.एन. के.पत्याणे-कनिष्ठ सहाय्यक सी.6विहीत मुदतीतकार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी
35 1)कॅश बुक/धनादेश नोंदवही /युडीआर नोंदवही अद्यावत करणे 2)वर्ग 1 व 2 ची पगार देयके त्याअनुषंगाने येणारी कामे. 3)अधिकारी/कर्मचारी यांचे प्राप्त रक्कमांचे वितरण करणे 4)विक्रिकर/आयकर विषयक सर्व धनादेश भरणा करणे व संबंधितास दाखले वितरीत करणे, नोंदवही अद्यावत करणे 5) आपले कार्यासनाकडील अभिलेख तयार करणे 6)वेळोवेळी कार्यालयीन प्रमुखांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे.श्रीम. ए.एस.टापरे-कनिष्ठ सहाय्यक कार्यासन क्र.रोखपाल.दररोजकार्यकारी अभियंता जिल्हा परिषद रत्नागिरी
अं.क्र.पंचायत समिती पहा
1 गुहागर View/पहा
2 मंडणगड View/पहा
3 दापोली View/पहा
4 खेड View/पहा
5 चिपळूण View/पहा
नाव :
पदनाम :
मोबाईल नंबर :
विषय :
अर्जाचा तपशील :